Sunday, January 20, 2019

MARATHI KAVITA.

काय सांगू प्रिये


काय सांगू प्रिये मी तुज्यावर 
किती प्रेम केल
फसव्या प्रेमाच्या नादात आयुष्य हरवून गेलं
एक हास्याची लकेर तुझी असायची लाखमोलाची 
मनातल गुफित व्यक्त करायला
 हिंमत नव्हती बोलायची
जेव्हा जेव्हा लागल तुला 
पाणी माझ्या डोळ्यात आलं
काय सांगू प्रिये मी तुझ्यावर
 किती प्रेम केलं
तू दिसत नव्हती जेव्हा तो दिवस उदास जायचा 
बागेतला गुलाबाचा मग रंग हि फिका व्हायचा 
मित्रांमध्ये असून सुद्धा मला एकांत कांत वाटायचं 
तुझ्याशिवाय कॉलेज प्रिये सुनं सुनं असायचं 
कळलच नही कळीज माझं तुला केव्हा दिलं
काय सांगू प्रिये मी तुझ्यावर
 किती प्रेम केलं
तुझ्याशी बोलावं अस खुपदा वाटायचं
तुझं मात्र माझ्याकडे अजिबात लक्ष नसायचं 
हिंमत करून मांडला मी प्रस्ताव माझ्या प्रेमाच्या 
पण 
तुझ्या नाकारणे रिता राहिला 
कोपरा माझ्या मनाचा 
एकाच वाटेवर चालायचं स्वप्न भंग झालं
काय सांगू प्रिये मी तुझ्यावर
 किती प्रेम केलं
फसव्या प्रेमाच्या नादात आयुष्य हरवून गेलं
                              --प्रीतम संजय दिकुंडवार




Friday, January 18, 2019

marathi kavita kana

कणा 


ओळखलात का सर मला? 
 पाऊसात आला कोणी 
कपडे होते अर्ध मळलेले 
केशांवरती  पाणी

क्षणभर बसला नंतर हसला 
बोलला वरती पाहून 
अंगामली पाहून
गेली घरट्यात वाहून

माहेरवाशीण पोरीसाठी
चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी 
बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली 

होते नव्हते नेले 
प्रसाद म्हणून पापन्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर
आता लढतो आहे 
पडकी भिंत बांधतो आहे 
चिखल गाळ काढतो आहे 

खिशाकडे हात जाताच 
हसत उठला ,पैसे नको सर मला 
जरा एकटेपणा वाटला 
मोडून पडला आहे संसार 
तरी मोडला नाही काणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा 
 -कुसुमाग्रज

                 

marathi kavita daw



         डाव

तिन्ही सांज्याच्या धुक्यात 
कटी कळशी घेऊन 
कुंकू कापळी भरून घेलीस तू 
वाट पाहून पाहून माझे शेवाळले डोळे 
पाय भयभीत वळे नदीकडे 
तिथे कळे तुझा डाव 
घट पडे घाटावर 
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी 
                  -कुसुमाग्रज 

Tuesday, January 15, 2019

Marathi Kavita मी चंद्र

रुसून माझिया प्रिये ,दूर नका जाऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

प्रेमाच्या बागेला दाटले धुके गैरसमजूतीचे 
म्हणुन न व्हावे कधी सुकणे कळ्यांचे 
फुलराणी तू माझी कोमेजून नका जाऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

आनंदाचे दिवस हे कधी ना त्याचा अंत 
विघ्न येतील कधी कधी म्हणून ,नका करू खंत 
सोनेरी हे दिवस प्रिये ,तू निराश नका होऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

प्रिये, तुझ्या माझ्या प्रेमाच गीत गातील सारे 
मिठीत माझ्या ,मिलनात आपल्या ,चंद्र सूर्य तारे 
प्रेम करेल इतक ,जग विसरून जाऊ 
रुसून माझिया प्रिये ,दूर नका जाऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

Monday, January 14, 2019

marathi kavitaआले भरून पाणी

सोडून पामराला गेलीस दूर राणी
डोळ्यात आज माझ्या आले भरून पाणी 

भेटेल प्रीत केव्हा माजे मला ना ठावे 
श्वासात घुंफली मी दुखी अशी कहाणी 
डोळ्यात आज माझ्या आले भरून पाणी 

स्वप्नात रोज माझ्या  येऊ नकोस आता 
चिरडून स्वप्न माझे केली कठोर वाणी 
डोळ्यात आज माझ्या आले भरून पाणी 

दर्वरून जेव्हा जाईल प्रेत यात्रा 
माझी जुनी पुराणी गाऊ नकोस गाणी 
डोळ्यात आज माझ्या आले भरून पाणी 

उरले उरत थोडे आकाश आसवांचे 
डोळ्यात भावनांचा का टोचते पराणी 
डोळ्यात आज माझ्या आले भरून पाणी 

विसरून जा सखे गं मी उरेल जगती 
जग सांगणार त्याची गाथा जुनी पुराणी 
सोडून पामराला गेलीस दूर राणी
डोळ्यात आज माझ्या आले भरून पाणी 
            --- संजय भोपतराव 

marathi kavita विशेष काही नाही

विशेष काही नाही 
एक फांदी तुटली आहे 
काही दिवस वाईट वाटल झाडाला 
आता झाड सुद्धा विसरत चाललय 
तुटल्या फांदीला नि सुटल्या नात्याला 
कारण फालवी फुटली आहे त्या झाडावर 
फांदी तुटल्याच दुख झाडाला तितक नसत 
मुळात दुख असते ते त्या पक्षाला 
ज्याच घरट त्या फांदीवर असत 
घामवाल दोघांनीही होत 
झाडणे फांदीने पण पक्षाने सर्वस्व 
पक्षी पाहत असतो फक्त वळणाऱ्या झाडाला 
तो आता घरटी बांधत नाही कदाचित 
फांदी तुटण्याची भीती वाटत असेल 
विशेष काही नाही एक फांदी तुटली आहे 
प्रेमाच्या झाडाची 
         -शेख एल  खालील 

Friday, January 11, 2019

Marathi kavitaप्रेम कर भिल्लासारख

पुरे झाले चंद्र सूर्य 
पुर्या झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा

मोरासारखी छातीकडून उभा राहा 
जाळेसारखा नजरेत नजर बांधून पहा 
सांग तिला तुज्या मिठीत स्वर्ग  आहे सारा 

शेवाळलेले शब्द आणिक यमक चंद करतील का 
डामरीसारखे हर्ष इंद्रधनू बांधील काय 
उन्हाळाच्या ढगासारखा हवेत राहशील फिरत 
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत 
नंतर तुला लगीन चिट्टी आल्याशिवाय राहील काय 

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ 
प्रेम नाही अक्षरांचा भातकुलीचा खेळ
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाण
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाण 

प्रेम कर भिल्ला सारख बणा वरती खोचलेल 
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं 
शब्दाच्या दुक्यामध्ये अडकू नकोस 
बुरुजावरती झेंड्यासारख फडकू नकोस 

उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेल
प्रेम कर भिल्ला सारख बणा वरती खोचलेल 
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं 
                                   -कुसुमाग्रज

MARATHI KAVITA प्रिये

प्रेमाचा  जांगड गुत्था गं
जीव झाला खलबत्ता  गं
उखडात  खुपसले  तोंड प्रिये 
मुसळाचा तुंबड रट्टा गं 

तू लाजाळू परी कोमल गं
मी झुनझु ळाचे झुडूप प्रिये
तू तुळशीवाणी  सत्वशील गं
मी अग्याबोंड ये टाळ प्रिये 

तू विडा रंगीवाला ताऱ्यांचा
मी रसवंती चा  चोथा गं
प्रेमाचा  जांगड गुत्था गं
जीव झाला खलबत्ता  गं

तू पखवाजाचा भाक्तीनाद 
मी खळखळ गायी हल्गीची 
तू विना हरीच्या हाताची
मी तुनतून तार तुन्तुण्याची 

तू आषाडवारी अभंग गं
मी परमिटरूमचा  अडकित्ता गं
प्रेमाचा  जांगड गुत्था गं
जीव झाला खलबत्ता  गं
               -  अनामिक

Tuesday, January 8, 2019

MARATHI KAVITA तुमच्या एका गोळीवर

कविता म्हणण्यासाठी   घरतून बाहेर पडतांना रक्त पाहण्याची सवय करून घे
मी आहे तोवर माज्या अंगावर खेळून घे 
सांगीतल आहे बायकोला आतापासून कुंकू लावू नकोस 
मी तारोडयात  पडल्यावर हरणीसारखी  हंबरू नकोस 
तुज्या हातात लेखाणी  घे पोरालाही शिकव 
त्याच्या मनात फुले साहू आंबेडकर रुजाव
अग तुझ्या  माझ्या  मिलनामधला  एक शिवाजी घडव 
आयुष्यभर त्याच्यामागे जिजाऊ मानून उभी राहा 
आणि तुमच्या एका गोळीवर माझंही नाव लिहा 
वाऱ्यालाही कळत नाही मोकळा श्वास मिळत नाही 
अरे दहशाती खाली घास सुधा गिळत नाही
पोटाल पिळ देऊन किती दिवस जागायचं 
मायबाप आमचे तुह्मी किती दिवस सांगायचं
डोळ्यासमोर आता एकाच माणू दिसतो आहे 
माझ्याकडे  बघून तो मला हसतो आहे 
कोण त्याच बाप आहे तुम्ही सुधा शोधून  घ्या 
नाहीतर तुमच्या एका गोळीवर माझ सुधा नाव लिहा 
                          -सागर काकडे 
 

MARATHI KAVITA आयुष्य

गरीबाच्या डोक्यावरची मोळी होण चांगल
कधी कधी फाकीराची झोळी होण चांगल 

शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा 
देशासाठी बंदुकीची गोळी होण चांगल 

कधी कधी आयुष्याची होळी होण चांगल
भुकेल्या पोटासाठी पोळी होण चांगल 
शोभेसाठी भरजरी वस्त्र होण्यापेक्षा 
उगडया माय बहिणीची चोळी होण चांगल
गरीबाच्या डोक्यावरची मोळी चांगल 

ज्ञानासाठी समुद्राची बुडी होण चांगल 
कधी कधी आकाशाची शिडी होण चांगल 
नारळाच्या झाडचं फळ होण्यापेक्षा 
कधी कधी गुलाबाची कळी होण चांगल 

जीवनात साखरेची गोडी होण चांगल
कधी कधी पाऊसाची झडी होण चांगल 
विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा 
घरोघरी समतेची गुडी होण चांगल

गरीबाच्या डोक्यावरची मोळी होण चांगल 
कधी कधी फाकीराची झोळी होण चांगल 

                                    -आत्मराम सोनाने

Thursday, January 3, 2019

MARATHI KAVITA जगण आपल राहून गेलं

डोळ्यात दाटून भावना सारे मलाच पाहत होते
कितीतरी ओळखी अनोळखी चेहरे त्यात होते

कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेल
मारता मारता सहज कळाल जगनं आपल राहून गेल

आयुष्यात नागमोळी  वळणाना मी खुपदा पाहल होत
जे क्षण होत निसटले त्यांना जगायचं राहायचं होत

श्वासात शेवटच्या  डोळ्यांसमोरून जीवन सार धावून गेलं
मरता मरता सहज काळाल जगण आपल राहून गेल

घरच्यांची स्वप्ने आज सारी एकदम होती चूर झाली 
रडताना म्हणाला कोणीतरी नियती इतकी क्रूर झाली

माझं त्यांच्यातून जान घरच्यांना घोर लावून गेलं
मरता मरता सहज काळाल जगण आपल राहून गेल

लोकांताला खोटा मान सन्मान यांना मी माझा म्हणालो 
आयुष्यभर अपेक्षांचे ओजेच पक्त वाहत आलो 

शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी प्रेत श्माशानिपर्यंत वाहून नेलं
जळता जळता परत आठवल जगण आपल राहून गेल
                 - विशाल मोहिते

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts