Friday, January 11, 2019

Marathi kavitaप्रेम कर भिल्लासारख

पुरे झाले चंद्र सूर्य 
पुर्या झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा

मोरासारखी छातीकडून उभा राहा 
जाळेसारखा नजरेत नजर बांधून पहा 
सांग तिला तुज्या मिठीत स्वर्ग  आहे सारा 

शेवाळलेले शब्द आणिक यमक चंद करतील का 
डामरीसारखे हर्ष इंद्रधनू बांधील काय 
उन्हाळाच्या ढगासारखा हवेत राहशील फिरत 
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत 
नंतर तुला लगीन चिट्टी आल्याशिवाय राहील काय 

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ 
प्रेम नाही अक्षरांचा भातकुलीचा खेळ
प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाण
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाण 

प्रेम कर भिल्ला सारख बणा वरती खोचलेल 
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं 
शब्दाच्या दुक्यामध्ये अडकू नकोस 
बुरुजावरती झेंड्यासारख फडकू नकोस 

उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेल
प्रेम कर भिल्ला सारख बणा वरती खोचलेल 
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं 
                                   -कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts