तू म्हणजे

तू म्हणजे चिमण्यांच्या चीवचिवटांनी
गजबजलेली पहाट
तू म्हणजे अथांग सागराची
उसळणारी लाट
तू म्हणजे कानाजवळ कुजबुज
करणारा उनाड वारा
शांत आणि स्थब्द असलेला
सागरी किनारा
तू म्हणजे सकाळी उगवलेल
गुलाबच फुल
शांततेत येणारं
प्रेमाची चाहूल
तू म्हणजे ओठांवर गुणगुणारी
प्रेमाची गाणी
नदीच्या पत्रातील
सळसळत पाणी
तू म्हणजे हरलेल्या माझ्या जगणावर केलेली
विजयाची मात
अंधारलेल्या जीवनाला प्रकाशमान
करणारी दिव्याची वात
- योगेश शिवरकार
No comments:
Post a Comment