Thursday, February 7, 2019

MARATHI KAVITA

तुझी  भेट



तू भेटायलीआलीस कि
माझा दिवस साजरा होतो 
मग नकळत मीही 
तुज्या केशातला गजरा होतो 

ओठ शिवाय गुजगोष्टी 
एकमेकांना बरोबर कळते
नजर नजर झाली कि
तुझी नजर खाली वळते

मला ठाऊक आहे 
तुझ्याआसवांची खरी किंमत 
तू चटकन डोळ्यात पाणी आणते 
म्हणून करते तुजी गम्मत 

पूर्वी सारखीआजही
 संध्याकाळ मोहरून येते 
सांजवेळी जुन्या आठवणी 
ओंजळीत माझ्या देऊन जाते 

बघ  जमलं तर 
भेटायला ये संध्याकळी
नको नको म्हणताना 
ओठ टेकून ज्या माझ्या कपाळी

पाहून तुझे नाजूक पाय 
बाबळीचा कटा जळतो 
पण त्याच्या प्रेमाच्या
 खरा अर्थ कुठे कळतो

म्हणून कधी कधी तुझे  पाय 
जमिनिवर ठेऊन बघ
आणि थोड तरी प्रेम सखे
काट्यांनाही देऊन बघ

काट्यांशिवाय गुलाबचाही 
 प्रेम कधी फुलात नाही
आणि त्यांना प्रेम काय कळणार 
ज्यांना काटा सालात नाही

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts