माझ्या आठवणी
माझ्या आठवणीना सांभाळून ठेव
जेवढे सांभाळता येईल तेवढे
आधी जसे सांभाळून ठेवायचीस ना
पुस्तकाच्या पानापानात
अगदी तशीच तुला आठवते
एकदा गुलाबाच्या पाकळ्या
झाकून ठेवल्या होत्या शब्दांना सुगंध यावा म्हणून
खरेच किती आजन होतो आपण
इतके साधेही काढत नव्हते
कि शब्दांचे सौंदर्य लिहनारयावर अवलंबुन असते
त्याने वापरलेल्या भाषेवर अवलंबून असते
मन दुखावणारे शब्द कुरूप वाटत जातात
आणि स्तुती करणारे शब्द अधिक जवळचे वाटतात
पण तुझ्या लक्षातयेत का?
हे सुद्धा शब्दांच मृगजळ आहे
शब्दांनी तयार केलेलं.
-------शरद काळे
No comments:
Post a Comment