काय सांगू प्रिये
काय सांगू प्रिये मी तुज्यावर
किती प्रेम केल
फसव्या प्रेमाच्या नादात आयुष्य हरवून गेलं
एक हास्याची लकेर तुझी असायची लाखमोलाची
मनातल गुफित व्यक्त करायला
हिंमत नव्हती बोलायची
जेव्हा जेव्हा लागल तुला
पाणी माझ्या डोळ्यात आलं
काय सांगू प्रिये मी तुझ्यावर
किती प्रेम केलं
तू दिसत नव्हती जेव्हा तो दिवस उदास जायचा
बागेतला गुलाबाचा मग रंग हि फिका व्हायचा
मित्रांमध्ये असून सुद्धा मला एकांत एकांत वाटायचं
तुझ्याशिवाय कॉलेज प्रिये सुनं सुनं असायचं
कळलच नही कळीज माझं तुला केव्हा दिलं
काय सांगू प्रिये मी तुझ्यावर
किती प्रेम केलं
तुझ्याशी बोलावं अस खुपदा वाटायचं
तुझं मात्र माझ्याकडे अजिबात लक्ष नसायचं
हिंमत करून मांडला मी प्रस्ताव माझ्या प्रेमाच्या
पण
तुझ्या नाकारणे रिता राहिला
कोपरा माझ्या मनाचा
एकाच वाटेवर चालायचं स्वप्न भंग झालं
काय सांगू प्रिये मी तुझ्यावर
किती प्रेम केलं
फसव्या प्रेमाच्या नादात आयुष्य हरवून गेलं
--प्रीतम संजय दिकुंडवार

No comments:
Post a Comment