Friday, January 11, 2019

MARATHI KAVITA प्रिये

प्रेमाचा  जांगड गुत्था गं
जीव झाला खलबत्ता  गं
उखडात  खुपसले  तोंड प्रिये 
मुसळाचा तुंबड रट्टा गं 

तू लाजाळू परी कोमल गं
मी झुनझु ळाचे झुडूप प्रिये
तू तुळशीवाणी  सत्वशील गं
मी अग्याबोंड ये टाळ प्रिये 

तू विडा रंगीवाला ताऱ्यांचा
मी रसवंती चा  चोथा गं
प्रेमाचा  जांगड गुत्था गं
जीव झाला खलबत्ता  गं

तू पखवाजाचा भाक्तीनाद 
मी खळखळ गायी हल्गीची 
तू विना हरीच्या हाताची
मी तुनतून तार तुन्तुण्याची 

तू आषाडवारी अभंग गं
मी परमिटरूमचा  अडकित्ता गं
प्रेमाचा  जांगड गुत्था गं
जीव झाला खलबत्ता  गं
               -  अनामिक

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts