Tuesday, January 15, 2019

Marathi Kavita मी चंद्र

रुसून माझिया प्रिये ,दूर नका जाऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

प्रेमाच्या बागेला दाटले धुके गैरसमजूतीचे 
म्हणुन न व्हावे कधी सुकणे कळ्यांचे 
फुलराणी तू माझी कोमेजून नका जाऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

आनंदाचे दिवस हे कधी ना त्याचा अंत 
विघ्न येतील कधी कधी म्हणून ,नका करू खंत 
सोनेरी हे दिवस प्रिये ,तू निराश नका होऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

प्रिये, तुझ्या माझ्या प्रेमाच गीत गातील सारे 
मिठीत माझ्या ,मिलनात आपल्या ,चंद्र सूर्य तारे 
प्रेम करेल इतक ,जग विसरून जाऊ 
रुसून माझिया प्रिये ,दूर नका जाऊ 
मी चंद्र तुझा आहे ,अबोल नका राहू 

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts