Tuesday, January 8, 2019

MARATHI KAVITA आयुष्य

गरीबाच्या डोक्यावरची मोळी होण चांगल
कधी कधी फाकीराची झोळी होण चांगल 

शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा 
देशासाठी बंदुकीची गोळी होण चांगल 

कधी कधी आयुष्याची होळी होण चांगल
भुकेल्या पोटासाठी पोळी होण चांगल 
शोभेसाठी भरजरी वस्त्र होण्यापेक्षा 
उगडया माय बहिणीची चोळी होण चांगल
गरीबाच्या डोक्यावरची मोळी चांगल 

ज्ञानासाठी समुद्राची बुडी होण चांगल 
कधी कधी आकाशाची शिडी होण चांगल 
नारळाच्या झाडचं फळ होण्यापेक्षा 
कधी कधी गुलाबाची कळी होण चांगल 

जीवनात साखरेची गोडी होण चांगल
कधी कधी पाऊसाची झडी होण चांगल 
विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा 
घरोघरी समतेची गुडी होण चांगल

गरीबाच्या डोक्यावरची मोळी होण चांगल 
कधी कधी फाकीराची झोळी होण चांगल 

                                    -आत्मराम सोनाने

No comments:

Post a Comment

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts