प्रश्न चिन्ह
प्रिय सखे
मी उदास आहे आज ,
मनात सारा दुखाच करतो राज
तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज
अश्यात मला आठवतात ते दिवस
होत काही नाही पण वाटायचा खास
बोलण्यासाठी माझ्याशी
तू उतावीळ असायचीस
एकाबाजूला मी नि दुसऱ्या बाजूला जग
तरी जगाला सोडून यायचीस
इतक प्रेम पाहून
देवाला धन्यवाद द्यायचो
हळूच प्रेम केलं
आणि आणखी प्रेमात पडायचो
आज प्रेम इतका झालं
त्याला सीमा नही देता येत मला
परिसीमा गाठलेल्या माझ्या प्रेमाची
मोल शुल्लक दिसतो तुला
एका पारड्यात आपण होतो
दुसऱ्या पारड्यात जग सारा
हा वेडा मी प्रेमाचा ,
एकाच तराजूत मैत्रीची आणि माझ्या प्रेमाची
तुलना करा
अस माझं प्रेम प्रिये मी
तुला समजावयाल जातो
समजणे राहिले दूरच प्रिये
तुझ्याकडून "तुझ्यावरील विश्वावर माझ्या "
प्रश्न चिन्ह घेऊन येतो