Saturday, December 29, 2018

Marathi kavita नातं

नात आधी रुजाव लागत 
खोल जमिनीत मुरव लागत 
थोडी माती थोड पाणी 
हलक्या हातानी शिंपाव लागत 
स्वच्छ सूर्य प्रकाशात ते बहराव 
कधी वारा तर कधी पाऊस 
घट्ट जमिनीतील मुळांवर विश्वासाव लागत 
ताटा सोडून झुळझुळ नार्या हवेवर कधी डोलाव लागत 
ऋतू बदलाल कि स्वतालाही बदलाव 
ज्याच्या त्याचा रंगत रंगाव 
गेण्या पेक्षा जास्त द्याव लागत 
जो पर्यंत अमिनीत ओलावा आहे तो पर्यंतच ओलावा अस्तित्व टिकून राहतो.
        -अनुजा  तुलसी 

Wednesday, December 19, 2018

Marathi kavita.आयुष्याला द्यावे उत्तर

असे जगावे दुनियामधे ,आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर 

नको गुलामी नक्षत्रांची ,भीती आंधळ्या तारांची 
आयुष्याला भिडताना हि, चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती  सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती ,काळीज कडून देताना

संकाटासही ठणकावून सांगावे ,आता ये बहतर
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर

करून जावे असेही काही ,दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जागास सारा, निरोप शेवटचा देताना 

स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर 
नजरेमध्ये नजर रोखूनी ,आयुष्याला द्यावे उत्तर 
  -   वि.दा.करंदीकर

    
                 -   वि.दा.करंदीकर

Tuesday, December 11, 2018

Marathi Kavita.माय

तुजी पापणी पापणी
जरी नयनात पाणी
गाती प्रेमाचे ते गाणी
जग आहे तुजे ऋणी

      तू जातेस एकला
      पण येतेस हाकेला
     तन कोरडा तुझा झाला
     परी मन तुझा ग अजून आहे ओला

केली कपाळाची माती
काटे पायात बोचती
तमा तुलाच ग खाती
पण हृदयी ग तुझ्या
आहे दिवटी तेवती

        तहानलेली आहेस ग आई
        तुला त्याची पर्वा नाही
        आला भरून तुज उर
         फुटला मायेचा पाझर

माय आहे रे माझी अशी
हृदयी नांदते कशी
ती आहे रे उपाशी
खायला मिळो मला
तिचे मागणे देवाशी

Tuesday, December 4, 2018

Marathi Kavita मराठी भाषा

जीते ममतेचा आहे आरसा
जीते जीवनाची आहे नशा
अश्या हृदयात माझ्या नांदे मराठी भाषा

      आज नसे तिला मान 
      पूर्वीची ती होती जान
     आज विहारते ती कुठे याचे कुणाना भान
      पण झुंजते;ते तिच्या रक्तात 
      सोडणार न कधी मराठी जात 
      तिच्या कर्तुत्वाला नाही कुठे नाही रेषा
      अश्या रक्तात माझ्या नांदे मराठी भाषा 

कधी झुंझाने मुघलांशी,आता झुंजणे ब्रिटीशांशी
वादनाच्या जरी आहे ती दाराशी 
मनाच्या कप्प्यात स्ठान तिचे स्वर्गाशी
 तिला जिंकण्याची अजून आहे आशा 
 अश्या हृदयात माझ्या नांदे मराठी भाषा

Saturday, December 1, 2018

Marathi kavita पाऊस

चिंब पाऊस गार वारा ,रान लागले खुलयाला
ओढ लावी मातीचा सुगंध,नाही तू मी एकला

         सळसळ करी पान,भिजलेल्या पाखरांचे किलबिल ते छान
         मन मयूर लागला नाचाया आणि सोबत नाही कोण 

घन नभ हे वर्षावात आले आज धरीतेच्या पास 
संवाद त्यांचा प्रीतीच्या गर्जनेचा सारे शांत आसपास

            गेला निघून गणराज केव्हाचा, मी मात्र तसाच तिथे 
           सारीकडे पाणीच पाणी,मंद वारा छेडतो मला तू नव्हातीस जिथे

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts