Friday, November 30, 2018

Marathi Kavita लावण्य

हा झोंबतो मधुर गारवा 
हसतो माझ्यावरी हा निसर्ग हिरवा 
संथ जलमानात माज्या तरंगे आणती हवा 
त्या चिंबलेल्या मनाची,काय सांगू गोडवा  
प्रभाती सूर गोवले
कोकिळेने पंख फडफडत गायलेले
निसर्गाचे अंग शहारले
ते लावण्य नयनात अंथरले 
पाहून मन माझे आनंदले 
मन मुके बोलू लागले
निसर्गा तू राहा गातच 
अश्या उदास मानला राहा चिंबवत..
दोन सूर हे असे आनंदाचे,हर्षेचे
मनात प्रत्येकाच्या राहा घुमवत.........


Sunday, November 25, 2018

मराठी कविता



कोकिळेच्या ओठांवरती 
मैनेचे हे गीत कसे 
कळले आज मला चरेवर 
काय असते प्रीत असे .....

आला वसंत हा बहरून 
नवी फुले पल्लवी नवी घेऊन 
स्वागते कोकिळा कुहू कुहून
मैना नाचे गीत गाऊन
आज त्यांचा ओठावर मिलनाचे हे सूर कसे
कळले मला चरेवर काय असते प्रीत असे ......

कोकिळा म्हणे आपण भगिनी 
स्वागतो वसंता गाऊन गाणी
सुरमयी अपुली वाणी
पण सुरात त्यांचा वसंताच्या ओढची आस कसे 
कळले आज मला काय साते प्रीत असे .........

Friday, November 23, 2018

मराठी कविता छाया

गर्द अंधारी एक साद येते 
केविलवाणी दशा तिची मन हेलावूणी जाते

                        उघडताच डोळे थेंब धावुनी येते 
                   घट्ट या हृदयालाही पाझरफुटू लागते

  निस्तेज तुज्या वाणीतून मधुबोली वाहे 
स्वार्थी हे श्रवणे माझे स्तब्ध स्तब्ध राहे

                       सावली आहेस तू सूर्यास्ताला निघून जाशील 
        संगमरवरी खडकात माझ्या छाया तुजी कोरून घेशील

Sunday, November 18, 2018

माझी माय

वेळ हि जेव्हा जाण्याची माझी आली
    हसणारी पापणीही मायेची ओली झाली
         कधी परतून तू येशील आस काळजाला
              वाट पाहे माय माझी दिवालाग नीला//

 गुंजणारे घर ते,सुने झाले आज
      सोडून मायेला त्या जातो हंसराज
          कधी आठवणी जीवघेणे ,कधी विरहाचे गाणे
              तळमळते सारखी ती,कधी स्वप्नात येणे
                कधी एकदा येशील निजत्या सांजेला
                   वाट पाहे माय माजी ,दिवा लागणीला //

   सोडले ते घर ,शिक्षणाचा नावाला
       येतेच आठवण,साहेब काय झाला
          परतलो मी जेव्हा ,उधाण आंनदाला
            प्रमाणे चिंब केला ,येणाऱ्या पाखराला
                  वाट पाहे माय माझी दिवा लागणीला //
       

Featured Post

MARATHI KAVITA ...PRASHN CHINH

 प्रश्न चिन्ह प्रिय सखे  मी उदास आहे आज , मनात सारा दुखाच करतो राज तक्रारीला विषय नाही ,वाटत सोडून द्याव कामकाज        अश्यात मला ...

Popular Posts